• Home
Thursday, April 16, 2026
  • Login
hellodharashiv.in
Advertisement
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.in
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Hello Dharashiv by Hello Dharashiv
02-Apr-2026 17:30 pm
in धाराशिव
A A
0

सांजा  : श्री रामनवमी, हनुमान जन्मोत्सव, रमजान ईद तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांजा गावामध्ये सर्व रोग निदानासाठी भव्य व सर्वसमावेशक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक ऐक्य, आरोग्य जागरूकता आणि गरजूंना मदतीचा हात या उद्दिष्टांमुळे आयोजित या शिबिराला ग्रामस्थांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.


हनुमंत आप्पा मित्र मंडळ यांच्या पुढाकारातून २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर पार पडले. गावातील विविध वयोगटातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना शहरातील महागड्या आरोग्य सेवांचा लाभ मिळणे कठीण असते, हे लक्षात घेऊन या शिबिरात अनेक महत्त्वाच्या तपासण्या व उपचार सवलतीच्या दरात किंवा मोफत उपलब्ध करून देण्यात आले.


या शिबिरामध्ये लहान मुलांच्या हृदयाच्या गंभीर आजारांवर मोफत ऑपरेशन करण्याची घोषणा करण्यात आली असून, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब ठरली आहे. तसेच गरीब व गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. विविध प्रकारची मोठी ऑपरेशन्स मुख्यमंत्री सहायता निधीतून मोफत करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
याशिवाय, अँजिओग्राफीसारखी महत्त्वाची तपासणी ५० टक्के सवलतीत उपलब्ध करून देण्यात आली. सोनोग्राफी तसेच पायातील नसांच्या तपासण्या (व्हेरिकोज व्हेन्स) देखील ५० टक्के सवलतीत करण्यात आल्या. त्यामुळे अनेक रुग्णांनी या संधीचा फायदा घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतली.


शिबिरात तज्ञ डॉक्टरांची अनुभवी टीम उपस्थित होती. डॉ. धनंजय पडवळ, डॉ. अजित ढिकले, डॉ. महेश पाटील, डॉ. अश्विनी धनंजय पडवळ, डॉ. वेंकटेश पोलावर, डॉ. धवल कुमार बनसोडे, डॉ. सागर सूर्यवंशी आणि डॉ. स्वप्नील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करण्यात आली. प्रत्येक रुग्णाची सविस्तर तपासणी करून आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन देण्यात आले. या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा त्यांच्या दारात उपलब्ध झाल्या. अनेकांनी प्रथमच आपली तपासणी करून घेतल्याचे सांगितले.

आयोजकांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा प्रकारचे शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत आणि विविध सणांच्या निमित्ताने समाजोपयोगी कार्याचा आदर्श ठेवत हनुमंत आप्पा मित्र मंडळाने राबवलेले हे शिबिर सांजा गावासाठी एक प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे.

यावेळी, हनुमंत (आप्पा )सुर्यवंशी, राजदीप गायकवाड,  मुकुंद   ( बापू )  सुर्यवंशी,   प्रदिप सुर्यवंशी, संदीप कदम, प्रविण (आबा )सुर्यवंशी, सुहास मोहिते, विकास बळी, सिद्दिक तांबोळी , प्रशांत सुर्यवंशी, ओम सुर्यवंशी, अभिजीत सुर्यवंशी, लतिफ शेख , रणजीत सुर्यवंशी, काका कदम, कुलदीप सुर्यवंशी, संतोष सुर्यवंशी, पंकज पाटील, सुदर्शन सुर्यवंशी, धर्मराज सूर्यवंशी, सुधीर चांदणे, महेश पवार,   अजय डोंगे, नवाज शेख हे उपस्थित होते.

Previous Post

बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

Next Post

नियम धाब्यावर, निधी वाटपात प्रचंड अनियमितता, आमदार कैलास पाटील यांची चौकशीची मागणी, शासनाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना मागितला स्वयंस्पष्ट अहवाल

Related Posts

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

April 12, 2026
धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

April 9, 2026
धाराशिव

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

March 22, 2026
धाराशिव

भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंतांच्या गाडीला भीषण अपघात

March 19, 2026
धाराशिव

मोठी बातमी;  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम इशारा, प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!

March 3, 2026
धाराशिव

दुबईत अडकले धाराशिव जिल्ह्यातील  ज्येष्ठ नागरिक, केंद्र सरकारकडे भारतात परत आणण्याची व्हिडिओद्वारे मागणी

March 3, 2026
Next Post

नियम धाब्यावर, निधी वाटपात प्रचंड अनियमितता, आमदार कैलास पाटील यांची चौकशीची मागणी, शासनाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना मागितला स्वयंस्पष्ट अहवाल

ताज्या बातम्या

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

April 16, 2026

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

April 16, 2026

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

April 12, 2026

Poppular News

  • बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माजी नगरसेवक रोहित निंबाळकर हल्ला प्रकरणी विजय राठोडसह आकाश तावडेंवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये निवडणुकीपूर्वी मुद्द्याची लढाई गुद्द्यावर, ‘उबाठा’ गटाच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला,  हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर, आणि कलेक्टरांचा “गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा” गाण्यावर डान्स, सर्व स्तरातून टीका

    0 shares
    Share 0 Tweet 0
hellodharashiv.in

© 2025

Navigate Site

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share