• Home
Thursday, April 16, 2026
  • Login
hellodharashiv.in
Advertisement
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.in
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

Hello Dharashiv by Hello Dharashiv
12-Apr-2026 18:39 pm
in धाराशिव
A A
0


धाराशिव: “उद्धव ठाकरे भेटत नाहीत” असे रडगाणे गाणारे आज स्वतःच्या कार्यकर्त्यांना भेटायला इतके का घाबरत आहेत? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी उपस्थित केला आहे. ॲड. भोरे यांनी शिंदेंच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार प्रहार करताना म्हटले की, “एकीकडे ‘धर्मवीर’ चित्रपटात स्वतःचे धाडस दाखवण्यासाठी नक्षलवाद्यांनाही न घाबरणारा सीन दाखवणारे शिंदे, प्रत्यक्षात आपल्याच कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरायला लागले? कारण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यामधे झालेल्या गोंधळाचे कारण देत खबरदारी म्हणून कार्यकर्त्यांना पहाटे घरातून उचलून नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे माध्यमातून प्रसारित झाले आहेत.



शिंदेंना आता स्वतःच्याच कार्यकर्त्यांना भेटण्याची तर भीती नाही वाटू लागली ? जर तसे नसेल, तर मग धाराशिवमध्ये त्यांच्याच दौऱ्याआधी अविनाश खापे, नितीन पाटील, प्रवक्ता योगेश केदार यांच्यासह अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना पहाटे घरातून उचलून नजरकैदेत ठेवण्याचे ‘पाप’ कशासाठी?”

रझाकारी मानसिकतेचा निषेध:



पुढील टीकेत भोरे म्हणाले की, “निजामी राजवटीत ज्याप्रमाणे दडपशाही करून जनतेचा आवाज दाबला जायचा, तसाच प्रकार आज धाराशिवमध्ये पाहायला मिळाला. लोकशाहीत संवादाला महत्त्व असते, पण या सरकारमध्ये फक्त ‘नजरकैद’ आणि ‘दहशत’ उरली आहे. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राबवली जाणारी ही कार्यपद्धती म्हणजे नव्या रूपातील ‘रझाकारी’ मानसिकता तर नाही ना?”



शिवसैनिकांचा अपमान आणि भाजप पुत्राला पायघड्या:

“स्वतःला ‘शिवसैनिक’ म्हणवून घेणारे आणि स्वाभिमानासाठी उठाव केला असे सांगणारे शिंदे एकीकडे शिवसैनिकांना नजरकैदेत टाकत आहेत,विमानतळावर स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अडवून धरले तर दुसरीकडे भाजप आमदारपुत्राला  ‘रेड कार्पेट’ आणि ‘डायरेक्ट एन्ट्री’ दिली जात आहे. हाच का तुमचा शिवसैनिकांचा स्वाभिमान? सत्तेसाठी लाचारी पत्करणारे हे जनतेच्या मनातली भीती घालवण्याऐवजी, स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच नजरकैदेत ठेऊन घाबरवण्याचे काम करत आहे,” अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी जोरदार प्रहार केला आहे

Previous Post

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चांवर, उबाठा गटाच्या प्रवक्त्यांनी केला खुलासा! म्हणाले…

Next Post

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

Related Posts

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

April 9, 2026
धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

April 2, 2026
धाराशिव

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

March 22, 2026
धाराशिव

भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंतांच्या गाडीला भीषण अपघात

March 19, 2026
धाराशिव

मोठी बातमी;  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम इशारा, प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!

March 3, 2026
धाराशिव

दुबईत अडकले धाराशिव जिल्ह्यातील  ज्येष्ठ नागरिक, केंद्र सरकारकडे भारतात परत आणण्याची व्हिडिओद्वारे मागणी

March 3, 2026
Next Post

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला... पत्नीला अटक

ताज्या बातम्या

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

April 16, 2026

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

April 16, 2026

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

April 12, 2026

Poppular News

  • बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माजी नगरसेवक रोहित निंबाळकर हल्ला प्रकरणी विजय राठोडसह आकाश तावडेंवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये निवडणुकीपूर्वी मुद्द्याची लढाई गुद्द्यावर, ‘उबाठा’ गटाच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला,  हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर, आणि कलेक्टरांचा “गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा” गाण्यावर डान्स, सर्व स्तरातून टीका

    0 shares
    Share 0 Tweet 0
hellodharashiv.in

© 2025

Navigate Site

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share