• Home
Thursday, April 16, 2026
  • Login
hellodharashiv.in
Advertisement
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.in
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Hello Dharashiv by Hello Dharashiv
22-Mar-2026 19:58 pm
in धाराशिव
A A
0

शहरातील मध्यवर्ती व महत्त्वाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समता नगर येथे अगदी रस्त्यावर सांडपाणी साचण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे ये-जा करणे कठीण झाले असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. समता नगरमधील बी अँड सी च्या लगत असलेल्या रस्त्यावर संडासचे पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. या पाण्यामुळे रस्त्यांची अवस्था खराब झाली असून, घसरून पडण्याच्या घटनाही घडत असल्याची माहिती समोर येत आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा विशेष फटका बसत आहे.



साचलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे. संबंधित यंत्रणेकडून यावर तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही.
नगरपरिषद प्रशासनाने “100 दिवसांत शहर स्वच्छ करण्याचा निर्धार” जाहीर केला होता. मात्र, 100 दिवस उलटूनही समता नगरमधील सद्यस्थिती पाहता हा दावा फोल ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. घोषणांमध्ये आणि प्रत्यक्ष कामात मोठी तफावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.


समता नगरसारख्या शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या भागात मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी वाढत आहे.



नगरपरिषदेचे पदाधिकारी विविध विकासकामांच्या वेळी सोशल मीडियावर रील्समध्ये दिसतात; मात्र या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका स्थानिकांकडून केली जात आहे. “प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी संबंधितांनी या ठिकाणी भेट देऊन उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे. स्थानिकांच्या मते, केवळ आश्वासने देऊन प्रश्न सुटणार नाहीत. संडासच्या पाण्याचा योग्य निचरा, गटार व्यवस्थेची दुरुस्ती आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या समस्येकडे प्रशासन कधी लक्ष देणार आणि नागरिकांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंतांच्या गाडीला भीषण अपघात

Next Post

बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

Related Posts

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

April 12, 2026
धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

April 9, 2026
धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

April 2, 2026
धाराशिव

भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंतांच्या गाडीला भीषण अपघात

March 19, 2026
धाराशिव

मोठी बातमी;  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम इशारा, प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!

March 3, 2026
धाराशिव

दुबईत अडकले धाराशिव जिल्ह्यातील  ज्येष्ठ नागरिक, केंद्र सरकारकडे भारतात परत आणण्याची व्हिडिओद्वारे मागणी

March 3, 2026
Next Post

बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

ताज्या बातम्या

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

April 16, 2026

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

April 16, 2026

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

April 12, 2026

Poppular News

  • बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माजी नगरसेवक रोहित निंबाळकर हल्ला प्रकरणी विजय राठोडसह आकाश तावडेंवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये निवडणुकीपूर्वी मुद्द्याची लढाई गुद्द्यावर, ‘उबाठा’ गटाच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला,  हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर, आणि कलेक्टरांचा “गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा” गाण्यावर डान्स, सर्व स्तरातून टीका

    0 shares
    Share 0 Tweet 0
hellodharashiv.in

© 2025

Navigate Site

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share