• Home
Saturday, April 25, 2026
  • Login
hellodharashiv.in
Advertisement
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.in
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

Hello Dharashiv by Hello Dharashiv
10-Jan-2026 11:15 am
in राजकारण
A A
0

धाराशिव: भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रविण (बप्पा) घुले हे तेरखेडा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. अद्याप जिल्हा परिषद निवडणूका जाहीर झाल्या नसल्या तरी इच्छुकांकडून हालचाली सुरू झाल्या असून मोर्चेबांधणी देखील सुरू करण्यात आली आहे. तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बप्पा घुले हे इच्छुक आहेत. प्रविण घुले हे तेरखेडा जिल्हा परिषद गटात मागील ५ वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच आरोग्य अशा विविध क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कामाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत.तेरखेडा परीसरात मोठ्या संख्येने भूमीहीन किंवा अल्पभूधारक कुटुंब आहेत ज्यांना कायम असा उत्पन्न स्त्रोत नाही. अशा जवळपास २००० व्यक्तींना केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असंघटित कामगार आणि कॉर्पोरेट (CSR फंड) माध्यमातून सततचे मानधन मिळवून देण्याचा प्रविण बप्पा घुले यांचा संकल्प आहे.सार्वजनिक सुरक्षा या अतिशय महत्त्वाच्या विषयात प्रविण (बप्पा) घुले हे मागील ५ वर्षांपासून तेरखेडा आणि परीसरात चालू असलेले विविध अवैध धंदे (अवैध दारूविक्री, मटका, सावकारी, गुंडगिरी) बंद व्हावेत यासाठीही प्रयत्नशील आहेत. एकीकडे पवनचक्की प्रकल्प कंपन्या तेरखेडा जिल्हा परिषद गटातील सर्वपक्षीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विविध कंत्राटाच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाणीद्वारे हाताशी धरून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असताना, जनसेवक म्हणून ओळखले जाणारे प्रविण (बप्पा) घुले हे सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहेत.नुकत्याच झालेल्या तेरखेडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत सर्व राजकीय पक्षांच्या एकजूट पॅनल विरोधात भाजपा पॅनल उभे करून एकट्याने कडवी झुंज देणाऱ्या प्रविण बप्पा घुले यांचा सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांसह त्यांच्या वरिष्ठांनीही चांगलाच धसका घेतलेल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. तसेच भाजपकडून देखील आपल्यालाच संधी मिळणार असल्याचा विश्वास प्रवीण घुले व त्यांच्या कार्यकर्त्यांना असून पक्ष नेमकी काय भूमिका घेतो हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे

Previous Post

धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’, मुख्यमंत्र्यांचे मोठे सहकार्य : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Next Post

पत्रकार सुनील ढेपे यांना तुळजापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर, ॲड. विशाल साखरे यांचा जोरदार युक्तिवाद

Related Posts

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

February 13, 2026
राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

January 31, 2026
राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

January 30, 2026
राजकारण

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

January 20, 2026
राजकारण

“पुढच्या ५० पिढ्या आम्हीच इथेचं राज्य करणार” मल्हार पाटलांच्या ‘या’ वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) चे जगदीश पाटील भडकले

December 31, 2025
राजकारण

मल्हार पाटीलांनी खासदार ओमराजे निंबाळकरांची ‘औकात’ काढत केली जोरदार टीका! म्हणाले….

December 30, 2025
Next Post

पत्रकार सुनील ढेपे यांना तुळजापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर, ॲड. विशाल साखरे यांचा जोरदार युक्तिवाद

ताज्या बातम्या

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

April 21, 2026

स्मशानातून धड-मुंडके गायब,अक्षय तृतीयेच्या दिवशी थरकाप उडवणारी घटना; तुळजापुरात भीतीचं सावट… नेमकं घडलं काय?

April 20, 2026

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

April 19, 2026

Poppular News

  • अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

    0 shares
    Share 0 Tweet 0
hellodharashiv.in

© 2025

Navigate Site

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share