• Home
Tuesday, April 21, 2026
  • Login
hellodharashiv.in
Advertisement
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.in
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“बनावट मीडीयाचा पर्दाफाश”, धाराशिव नगरपालिका निवडणुकीत फेक एक्झिट पोल प्रकरणात अखेर धाराशिव 2.0 वर गुन्हा दाखल…

Hello Dharashiv by Hello Dharashiv
12-Dec-2025 20:12 pm
in क्राईम
A A
0

धाराशिव : नगरपालिका निवडणुकीदरम्यान पसरवण्यात आलेल्या बनावट एक्झिट पोल प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 10 दिवसानंतर धाराशिव सायबर पोलिस ठाण्यात बनावट एक्झिट पोल वायरल करणाऱ्या धाराशिव 2.0 वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका बनावट टीव्ही चॅनलच्या नावाखाली एका उमेदवाराला विजयी दाखवणारा फेक एक्झिट पोल व्हायरल करण्यात आला होता. मतदानापूर्वी अशाप्रकारे दिशाभूल करणारे साहित्य प्रसारित करणे हे लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951, कलम 126(A) चे स्पष्ट उल्लंघन ठरते. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी ९ डिसेंबर रोजी “तात्काळ FIR करा” असा कठोर आदेश जारी केला होता. ओंकार देशमुख यांनी आदेश काढुनही गुन्हा दाखल होत नसल्याने युवासेना आक्रमक झाली होती. दरम्यान, गुन्हा दाखल झाला नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील युवा सेनेकडून देण्यात आला होता. युवा सेनेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तात्काळ धाराशिव येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, आदेश दिल्यानंतरही तब्बल नऊ दिवस कारवाई न झाल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आता सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने प्रकरणात गती येण्याची शक्यता आहे. तरीही, उशीर का झाला? आदेश असूनही FIR त्वरित नोंदवली गेली नाही, यामागे नेमके कोणाचा दबाव होता? असा प्रश्न नागरिकांमध्ये अद्यापही तीव्रतेने कायम आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू करण्यात आली असून बनावट एक्झिट पोल तयार करणारे आणि व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाने धाराशिव नगरपालिका निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या कलमानुसार करण्यात आला गुन्हा दाखल

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 126 (A), BNS 2023-223, 337, 353, IT ACT – 66(5) या कलमान्वये धाराशिव 2.0 वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवासेनेच्या पाठपुराव्याला यश

दरम्यान सदर प्रकरणात, युवा सेनेचे तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी फेक एक्झिट पोल प्रकरणात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत धाराशिव चे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना स्वयंस्पष्ट अहवाल देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Previous Post

बनावट एक्झिट पोल प्रकरणात प्रशासनाचे संशयास्पद मौन— आदेश असूनही FIR नाही! धाराशिव प्रशासनावर जनतेचा रोष

Next Post

“संघर्षातूनच विजयाचा नवा इतिहास घडवू” –नगरपालिका निकालाच्या पराभवानंतरही कार्यकर्त्यांना दिला आत्मविश्वास

Related Posts

क्राईम

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

April 21, 2026
क्राईम

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

April 19, 2026
क्राईम

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

April 16, 2026
क्राईम

पत्रकार सुनील ढेपे यांना तुळजापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर, ॲड. विशाल साखरे यांचा जोरदार युक्तिवाद

January 12, 2026
क्राईम

बनावट एक्झिट पोल प्रकरणात प्रशासनाचे संशयास्पद मौन— आदेश असूनही FIR नाही! धाराशिव प्रशासनावर जनतेचा रोष

December 11, 2025
क्राईम

“Dharashiv 2.0 च्या फेक एक्झिट पोलवरून वाद पेटला, मतदानापूर्वी पोल टाकणे गंभीर गुन्हा, काय आहे ‘या’ गुन्ह्याची शिक्षा?

December 6, 2025
Next Post

“संघर्षातूनच विजयाचा नवा इतिहास घडवू” –नगरपालिका निकालाच्या पराभवानंतरही कार्यकर्त्यांना दिला आत्मविश्वास

ताज्या बातम्या

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

April 21, 2026

स्मशानातून धड-मुंडके गायब,अक्षय तृतीयेच्या दिवशी थरकाप उडवणारी घटना; तुळजापुरात भीतीचं सावट… नेमकं घडलं काय?

April 20, 2026

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

April 19, 2026

Poppular News

  • अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट ओढत नेऊन ओढ्याजवळ फेकला… पत्नीला अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • बोलेरो पिकअप–मोटरसायकल अपघातात वाजिद पठाण यांचा मृत्यू , धराशिववर शोककळा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

    0 shares
    Share 0 Tweet 0
hellodharashiv.in

© 2025

Navigate Site

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share