शहरातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत भाजपात अधिकृत प्रवेश केला. नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे आणि अक्षय जोगदंड यांनी राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. धाराशिव मधील या दोन नगरसेवकांनी पक्षप्रवेश केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी अनुराधा लोखंडे यांनी सोशल मीडियावर खोचक पोस्ट करत निशाणा साधला आहे. “माणूस शिवसेनेचा लढला काँग्रेसकडून निवडून आला आणि आता विकास करणार भाजपमध्ये जाऊन” अशा आशयाची खोचक पोस्ट अनुराधा लोखंडे यांनी केली आहे. अनुराधा लोखंडे यांच्या पोस्टची जिल्हाभरात चर्चा असून गमतीशीर कमेंट देखील या पोस्टवर येताना पाहायला मिळत आहेत.











