• Home
Wednesday, March 4, 2026
  • Login
hellodharashiv.in
Advertisement
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.in
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

Hello Dharashiv by Hello Dharashiv
30-Jan-2026 11:39 am
in राजकारण
A A
0

धाराशिव | राज्याचे लक्ष लागून असलेल्या तेर जिल्हा परिषद गटात निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच रंगला असून, येथे “दुरंगी लढतीचे” स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे तेरमधील प्रभावी नेतृत्व मुन्ना खटावकर यांच्या पत्नी कीर्तीमाला खटावकर यांच्यात थेट सामना होत असल्याने प्रचाराचा ताप दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.
जिल्हा परिषद निवडणुकीचा आखाडा जसजसा पेटत चालला आहे, तसतशी ही लढत अधिकच तीव्र होत आहे. अर्चना पाटील या पद्मसिंह पाटील यांच्या सून तसेच भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी असून त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद व प्रशासनाचा तगडा अनुभव आहेच, शिवाय मजबूत राजकीय व कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने या निवडणुकीतील त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
दुसरीकडे, कीर्तीमाला खटावकर यांचे पती मुन्ना खटावकर हे तेरमध्ये सामान्य कुटुंबातील नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते खासदार ओमराजे निंबाळकर यांचे विश्वासू मानले जात असून त्यांच्या पाठीशी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची ताकद उभी आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांनी कीर्तीमाला खटावकर यांना उमेदवारी देत थेट रणांगणात उतरवले आहे.
जरी समोरासमोरचा सामना कीर्तीमाला खटावकर विरुद्ध अर्चना पाटील असा दिसत असला, तरी राजकीय जाणकारांच्या मते खरी लढत ही भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे गट व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातच आहे.
आता या तेर गटातील दुरंगी लढतीत नेमकी बाजी कोण मारणार? याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष लागून राहिले आहे.

Previous Post

सांजा येथील सिद्दीक तांबोळी यांची युवासेनेच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती; पक्षात नवचैतन्य

Next Post

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

Related Posts

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

February 13, 2026
राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

January 31, 2026
राजकारण

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

January 20, 2026
राजकारण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 10, 2026
राजकारण

“पुढच्या ५० पिढ्या आम्हीच इथेचं राज्य करणार” मल्हार पाटलांच्या ‘या’ वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) चे जगदीश पाटील भडकले

December 31, 2025
राजकारण

मल्हार पाटीलांनी खासदार ओमराजे निंबाळकरांची ‘औकात’ काढत केली जोरदार टीका! म्हणाले….

December 30, 2025
Next Post

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

ताज्या बातम्या

मोठी बातमी;  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम इशारा, प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!

March 3, 2026

दुबईत अडकले धाराशिव जिल्ह्यातील  ज्येष्ठ नागरिक, केंद्र सरकारकडे भारतात परत आणण्याची व्हिडिओद्वारे मागणी

March 3, 2026

स्थगितीच्या राजकारणात अडकलेली कार्डियाक कॅथलॅब तातडीने सुरू करून जनतेच्या सेवेत द्यावी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली मागणी

February 27, 2026

Poppular News

  • मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माजी नगरसेवक रोहित निंबाळकर हल्ला प्रकरणी विजय राठोडसह आकाश तावडेंवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये निवडणुकीपूर्वी मुद्द्याची लढाई गुद्द्यावर, ‘उबाठा’ गटाच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला,  हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर, आणि कलेक्टरांचा “गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा” गाण्यावर डान्स, सर्व स्तरातून टीका

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट? धाराशिव पोलीस करणार दूध का दूध – पाणी का पाणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
hellodharashiv.in

© 2025

Navigate Site

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share