• Home
Wednesday, March 4, 2026
  • Login
hellodharashiv.in
Advertisement
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.in
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

Hello Dharashiv by Hello Dharashiv
31-Jan-2026 11:03 am
in राजकारण
A A
0

तेरखडा (प्रतिनिधी) – आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा नेतृत्व विकी चव्हाण यांच्या प्रचाराचा आज भव्य शुभारंभ झाला. या प्रचाराचा शुभारंभ तेरणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन केशव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी गर्दी उसळली असून विशेषतः युवकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला आहे.

ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवसेनेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे तेरखडा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी बोलताना विकी चव्हाण यांनी तेरखड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस भूमिका मांडली. “तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांना न्याय, आणि सामान्य नागरिकांना सक्षम प्रशासन देणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवून काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले तेरणा कारखान्याचे व्हा. चेअरमन केशव सावंत यांनी विकी चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असल्याचे सांगितले. युवकांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या शुभारंभप्रसंगी शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्ते, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही युवकांनी यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याचेही पाहायला मिळाले.

एकूणच, विकी चव्हाण यांच्या प्रचाराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता तेरखडा जिल्हा परिषद शिवसेनेकडे झुकणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Previous Post

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

Next Post

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे यांची दमदार एन्ट्री; निवडणूक चुरशीची!

Related Posts

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

February 13, 2026
राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

January 30, 2026
राजकारण

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

January 20, 2026
राजकारण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 10, 2026
राजकारण

“पुढच्या ५० पिढ्या आम्हीच इथेचं राज्य करणार” मल्हार पाटलांच्या ‘या’ वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) चे जगदीश पाटील भडकले

December 31, 2025
राजकारण

मल्हार पाटीलांनी खासदार ओमराजे निंबाळकरांची ‘औकात’ काढत केली जोरदार टीका! म्हणाले….

December 30, 2025
Next Post

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे यांची दमदार एन्ट्री; निवडणूक चुरशीची!

ताज्या बातम्या

मोठी बातमी;  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम इशारा, प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!

March 3, 2026

दुबईत अडकले धाराशिव जिल्ह्यातील  ज्येष्ठ नागरिक, केंद्र सरकारकडे भारतात परत आणण्याची व्हिडिओद्वारे मागणी

March 3, 2026

स्थगितीच्या राजकारणात अडकलेली कार्डियाक कॅथलॅब तातडीने सुरू करून जनतेच्या सेवेत द्यावी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली मागणी

February 27, 2026

Poppular News

  • मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माजी नगरसेवक रोहित निंबाळकर हल्ला प्रकरणी विजय राठोडसह आकाश तावडेंवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये निवडणुकीपूर्वी मुद्द्याची लढाई गुद्द्यावर, ‘उबाठा’ गटाच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला,  हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर, आणि कलेक्टरांचा “गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा” गाण्यावर डान्स, सर्व स्तरातून टीका

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट? धाराशिव पोलीस करणार दूध का दूध – पाणी का पाणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
hellodharashiv.in

© 2025

Navigate Site

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share