खामसवाडी जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते शंतनू पायाळ यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गावोगावी भेटी देत स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी व्यापक जनसंवाद अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे.
राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी असावे, या भूमिकेतून शंतनू पायाळ विकासाभिमुख राजकारणावर भर देत आहेत. त्यांच्या पुढाकारातून आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४७८ तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, ही केवळ सुरुवात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी काळात मतदारसंघातील तरुणांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगार मेळावे तसेच महिला बचतगटांच्या माध्यमातून माता-भगिनींसाठी स्वयोरोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंब, स्वावलंबी महिला आणि रोजगारक्षम तरुण हीच खऱ्या अर्थाने विकासाची दिशा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खामसवाडी गटातील नागरिकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता, शंतनू पायाळ यांची ही मोर्चेबांधणी विकासाच्या मुद्द्यांभोवतीच केंद्रित असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.











