• Home
Tuesday, March 3, 2026
  • Login
hellodharashiv.in
Advertisement
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.in
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

स्थगितीच्या राजकारणात अडकलेली कार्डियाक कॅथलॅब तातडीने सुरू करून जनतेच्या सेवेत द्यावी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली मागणी

Hello Dharashiv by Hello Dharashiv
27-Feb-2026 10:25 am
in धाराशिव
A A
0

जिल्ह्यात वाढत्या हृदयविकाराच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा अद्याप सुरू न झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी जिल्ह्यात स्थगितीच्या राजकारणामुळे अडकलेले  कार्डियाक कॅथलॅब, एमआरआय मशीन आणि 500 बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचे काम तातडीने पूर्ण करून सुरू करावे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली.


स्थगितीमुळे कॅथलॅब उभारणीला विलंब; रुग्णांच्या जीवावर बेतणारी परिस्थिती


आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत बोलताना म्हटलं की, आजकाल केवळ वयोवृद्धच नव्हे तर तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक वर्षांपासून कार्डियाक कॅथलॅब नसल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागत आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये आरोग्य विभागाने कॅथलॅबसाठी सुमारे 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता आणि काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. ऑक्टोबर 2024 पर्यंत कॅथलॅब सुरू होणे अपेक्षित असताना अद्याप काम पूर्ण झालेले नाही. दहा बेडचे हॉस्पिटल आणि कार्डियाक कॅथलॅब मंजूर असूनही सुविधा सुरू न झाल्याने गंभीर रुग्णांना सोलापूर येथे हलवावे लागत आहे. मात्र ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे आमदार पाटील यांनी सभागृहात सांगितले.

केवळ कमिशनरच्या सहीअभावी मशीन सुरू झालेली नाही – आमदार कैलास पाटील

ट्रान्सफॉर्मर व जनरेटरच्या अडचणीमुळे काम रखडले
कॅथलॅबसाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटरच्या निधीला स्थगिती मिळाल्याने काम अपूर्ण राहिल्याचे त्यांनी नमूद केले. 2025–26 मध्ये पुन्हा मंजुरी देण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली. एमआरआय मशीन सुरू करण्यासही विलंब धाराशिवसाठी मंजूर असलेली एमआरआय मशीन सरकार बदलल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्याचा घाट घालण्यात आला होता मात्र, धाराशिवकारांनी आंदोलन आणि त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध केल्याने एम आर आय मशीन धाराशिव मध्ये ठेवण्यात आली.  मात्र, एमआरआयचे काम पूर्ण झाले असूनही केवळ कमिशनरच्या सहीअभावी मशीन सुरू झालेली नाही. त्यामुळे रुग्णांना तपासणीसाठी बाहेर जावे लागत असून लोकांची हेळसांड होत असल्याचे  आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात बोलताना सांगितले.


500 बेड सिव्हिल हॉस्पिटलचे कामही रखडले


धाराशिवमध्ये 500 बेडचे सिव्हिल हॉस्पिटल मंजूर झाले असले तरी सुरुवातीला निधीची तरतूद नव्हती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँक मार्फत निधी मंजूर झाला, मात्र प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे असून काम तातडीने सुरू केल्यास मोठा दिलासा मिळेल, असे आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले.

Previous Post

‘कानफुक्या रील स्टार’ सभापतीचा दुहेरी चेहरा, महिलांच्या स्वच्छतेच्या प्रश्नावर सपशेल फेल

Next Post

दुबईत अडकले धाराशिव जिल्ह्यातील  ज्येष्ठ नागरिक, केंद्र सरकारकडे भारतात परत आणण्याची व्हिडिओद्वारे मागणी

Related Posts

धाराशिव

मोठी बातमी;  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम इशारा, प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!

March 3, 2026
धाराशिव

दुबईत अडकले धाराशिव जिल्ह्यातील  ज्येष्ठ नागरिक, केंद्र सरकारकडे भारतात परत आणण्याची व्हिडिओद्वारे मागणी

March 3, 2026
धाराशिव

‘कानफुक्या रील स्टार’ सभापतीचा दुहेरी चेहरा, महिलांच्या स्वच्छतेच्या प्रश्नावर सपशेल फेल

February 16, 2026
धाराशिव

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे यांची दमदार एन्ट्री; निवडणूक चुरशीची!

February 4, 2026
धाराशिव

सांजा येथील सिद्दीक तांबोळी यांची युवासेनेच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती; पक्षात नवचैतन्य

January 27, 2026
धाराशिव

रोहन मोरे यांचा अपक्ष अर्ज; बंडखोरी कायम राहणार की वरिष्ठ नेत्यांचे ऐकणार?

January 21, 2026
Next Post

दुबईत अडकले धाराशिव जिल्ह्यातील  ज्येष्ठ नागरिक, केंद्र सरकारकडे भारतात परत आणण्याची व्हिडिओद्वारे मागणी

ताज्या बातम्या

मोठी बातमी;  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम इशारा, प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!

March 3, 2026

दुबईत अडकले धाराशिव जिल्ह्यातील  ज्येष्ठ नागरिक, केंद्र सरकारकडे भारतात परत आणण्याची व्हिडिओद्वारे मागणी

March 3, 2026

स्थगितीच्या राजकारणात अडकलेली कार्डियाक कॅथलॅब तातडीने सुरू करून जनतेच्या सेवेत द्यावी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली मागणी

February 27, 2026

Poppular News

  • मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माजी नगरसेवक रोहित निंबाळकर हल्ला प्रकरणी विजय राठोडसह आकाश तावडेंवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये निवडणुकीपूर्वी मुद्द्याची लढाई गुद्द्यावर, ‘उबाठा’ गटाच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला,  हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर, आणि कलेक्टरांचा “गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा” गाण्यावर डान्स, सर्व स्तरातून टीका

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट? धाराशिव पोलीस करणार दूध का दूध – पाणी का पाणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
hellodharashiv.in

© 2025

Navigate Site

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share